संपादक-२०२४ - लेख सूची

मनोगत

स्नेह. येत्या एप्रिल/मे मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आजचा सुधारक’चा अंक प्रकाशित करतो आहोत. आव्हाने अनेक आहेत. भाजप आत्तापासूनच आपल्या सलग तिसऱ्या विजयाच्या दुदुंभी फुंकत आहे. INDIA आघाडी पर्याय म्हणून समोर यायला धडपडत आहे. निवडणुकांआधी प्रचार, अपप्रचार, कुप्रचार ह्यांचा कोलाहल असतोच. त्यात आता सोशल मीडिया, एआयचा वाढता वापर यांतून वाढलेला गोंधळ!! अश्यात सामान्य नागरिक मतदाता म्हणून …

आवाहन

लेखाजोखा सरकारचा – नागरिक मूल्यमापन विशेषांक आपल्या प्रातिनिधिक लोकशाहीत दर पाच वर्षांनी आपणच लोकप्रतिनिधी निवडून देत असल्यामुळे त्यांची कामे लोककेंद्रित असणे अपेक्षित असते. यासाठी सत्ताधारी पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यातील मुद्द्यांपैकी किती कामे केलीत वा किती केली नाहीत ह्याचा आढावा वेळोवेळी घेत राहणारी सक्रिय यंत्रणा असायला हवी. माध्यमांची भूमिका खरे तर इथे महत्त्वाची ठरते. परंतु सद्य:स्थितीत हे …

मनोगत

चित्र : तनुल विकमशी आपल्या समाजात नास्तिकांची संख्या किती या प्रश्नाचे नेमके उत्तर मिळणे कठीणच! याचे एक कारण म्हणजे याच्या नोंदणीची कुठे सोय नाही. आणि दुसरे म्हणजे नास्तिक असणारे अनेकजण उघडपणे आपली अशी ओळख देऊ इच्छित/धजावत नाहीत. खरे तर संशयवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांतून सुरू होणारा प्रवास स्वाभाविकपणे नास्तिकतेकडे जातो. विज्ञान, तंत्रज्ञान यांतून मिळणाऱ्या सुविधांचा उपभोग …

आवाहन

स्नेह सध्याच्या सामाजिक वातावरणात वर्तमानपत्रे, निरनिराळ्या वाहिन्या, सोशल मीडिया या सर्व माध्यमांना आपल्या कह्यात घेऊन देव-धर्माचा आणि बुरसट परंपरांचा कर्कश कोलाहल करणाऱ्यांचा उन्माद वाढताना दिसतो आहे. धर्म, धार्मिक आस्था यांमुळे जगभरात अनेक युद्धे झाली, नरसंहार झाला. अगदी अलीकडे सुरू असणारे  इस्राईल आणि हमस यांच्यामधील युद्ध याच प्रकारचे. असे असूनही मानवी जीवनात धार्मिक आस्था, श्रद्धा यांचे …